वंचित बहुजन आघाडीचं सोलापूर लोकसभेसाठीच्या जागेचं चिन्ह ठरलं..

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचं सोलापुरातील लोकसभेसाठीच्या जागेचं चिन्ह ठरलं आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा उमेदवारीसाठी अधिकृत चिन्ह म्हणून कपबशीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापर येथे प्रकाश आंबेडकर यांचे ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह असणार आहे.

सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर सुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे. दरम्यान याठिकाणी बसपचे उमेदवार राहुल सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बसपच्या उमेदवाराने लढू नये, अशी दलित संघटनांची मागणी होती. बसपने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बसपच्या राहुल सरवदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)