आऊटसोर्सिंगची कामे बंद करुन स्थानिकांनाच रोजगार – राहुल गांधी 

file photo

छत्तीसगड – छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमणसिंह यांनी दिले. पण प्रत्यक्षात कोणाला रोजगार मिळाला नाही. याऊलट आऊटसोर्सिंग केल्याने स्थानिक तरूण रोजगारापासून वंचित राहिले. पण छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता आल्यास आऊटसोर्सिंगची कामे बंद करुन स्थानिकांनाच रोजगार दिला जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

छत्तीसगडमधील कांकेर प्रचारसभेत शनिवारी राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरुन मोदी सरकार आणि मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यावर टीका केली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह हे भ्रष्ट मुख्यमंत्री असून त्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणात आले होते. पाकिस्तानमध्ये पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्याने पंतप्रधानांनाही तुरुंगात जावे लागले. पण छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्या मुलावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

-Ads-

चिटफंड घोटाळा आणि पीडीएस घोटाळ्यातही रमणसिंह यांचा सहभाग होता. पीडीएस घोटाळ्यातील नोंदवहीत मुख्यमंत्री मॅडम आणि डॉक्‍टर साहेबांना पैसे दिल्याचा उल्लेख होता. हे दोघे कोण आहेत, हे रमणसिंह यांनी जनतेला सांगावे, असे आव्हानच त्यांनी दिले. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता आल्यास 10 दिवसांच्या आत शेतकऱयांचे कर्जमाफ केले जाईल. तसेच छत्तीसगडमधील काम आऊटसोर्स केले जाणार नाही. यामुळे परप्रांतीयांऐवजी स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल,असेही त्यांनी सांगितले. सध्या देशाचे चौकीदार भ्रष्टाचार, बेरोजगारी, नोटाबंदी अशा कोणत्याही विषयावर बोलत नाही, असे त्यांनी नमूद केले.

मोदींच्या काळातच नीरव मोदी, विजय मल्ल्या हे बॅंकांचे पैसे बुडवून परदेशात पळाले. मोदींनी श्रीमंत उद्योजकांचे 3 लाख 50 हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. पण गरीब शेतकऱ्यांचे कर्ज त्यांना माफ करता आले नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली. मी खोटी आश्वासने देत नाही, खोटेही बोलत नाही. जे बोलतो ते करुन दाखवतो. मी एकदा खोटे बोलून सत्ता मिळवीन. पण दुसऱ्यांदा मी जेव्हा येईन तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्हाला एक जिल्हा किंवा विशिष्ट धर्म किंवा जातीसाठी नव्हे तर सर्वांसाठी काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)