नवी दिल्ली – मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर आज रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. यानुसार रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे रेपो दर ६.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के झाला आहे. यामुळे तुमचे गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच इतर प्रकारच्या कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने मागील तीन पतधोरणात रेपो रेट ‘जैसे थे’च ठेवला होता.
रिझर्व्ह बँकेने २०१९-२०च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर हा ७.४ राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर महागाई ३.२ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीत ६ सदस्य आहेत. त्यातील 4 सदस्यांनी रेपो रेटमध्ये घट करण्याच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, गव्हर्नरपदी विराजमान झाल्यानंतर शक्तीकांत दास यांची पतधोरण समितीची ही पहिलीच बैठक होती.
RBI: Repo rate reduced by 25 basis points, now at 6.25 from 6.5 per cent pic.twitter.com/GQ1kaWOmL0
— ANI (@ANI) February 7, 2019
RBI Governor: Headline inflation is expected to remain contained below or at its target of 4%. This has opened space for policy action. Investment activity is recovering supported mainly by public spending on infrastructure https://t.co/XybZ9CT6sj
— ANI (@ANI) February 7, 2019
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा