श्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज

कोलंबो (श्रीलंका) : श्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देऊ केले आहे. ही कर्जाची रक्कम 1 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवता येऊ शकणार आहे. मंगळवारी एका वृत्तसंस्थेला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. बॅंक ऑफ चायना चीनमधील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी बॅंक आहे.

श्रीलंकेचे रेटिंग कमी झाल्याने अन्य कोठून कर्जाची उपलब्धता होऊ शकत नाही, परिंणामी श्रीलंकेचे सरकार बॅंक ऑफ चायनाने देऊ केलेले हे कर्ज स्वीकारण्याबाबत विचार करत असल्याचे कोलंबोमधील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. या बाबतीत श्री लंकेच्या अर्थ मंत्रालयाशी वा बॅंक ऑफ चायनाशी संपर्क होऊ शकला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेला पूर्वी घेतलेल्या कर्जांची परतफेड करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले आहे. या वर्षी श्रीलंकेला विक्रमी 5.9 अब्ज डॉलर्स कर्जाची परतफेड करायची असून त्यापैकी 2.6 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड पहिल्या तीन महिन्यात करायची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)