खाणीतील मजुरांना जिवंत वा मृत-बाहेर काढा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: मेघालयातील एका खाणीत गेले 22 दिवस अडकून पडलेल्या 15 मजुरांना जिवंत वा मृत बाहेर काढण्याचे आदेश देताना त्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे जयंतिया हिल्स भागाच्या लुम्थारी गावातील एका बेकायदा खाणीत 13 डिसेंबर रोजी हे 15 मजूर 370 फूट खोल अडकून पडले आहेत. या मजुरांना वाचविण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आतापर्यंत केलल्या प्रयत्नांना यश का आले नाही, असे विचारताना लष्कराची मदत का घेतली नाही? असा प्रश्‍नही सर्वोच्च न्यायालयाने केला.

खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी करण्यात आली. न्यायमूर्ती ए के सिक्री आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने मजुरांना वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत केलेल्या प्रयत्नांची माहिती शुक्रवारी देण्यास सागितले आहे. एनडीआरएफचे 72, भारतीय नौदलाचे 14 जवान आणि कोल इंडियाचे कर्मचारी या मजुरांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असल्याचे सरकारने सांगितले आहे. त्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि कोल इंडियाने खाणीतील पाणी काढण्यासाठी 18 पंपांची व्यवस्था केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जेमतेम एक माणूस जाऊ शकेल अशा बिळातून 22 जण कोळसा काढण्यासाठी गेले होते. सुदैवाने पाणी भरण्यापूर्वी सहा जण बाहेर पडले. बाहेर पडलेल्यापैकी एकाने ही माहिती दिली आहे.
खाणीच्या मालकाला अटक करण्यात आलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)