लिव्हरपूल पहिल्या स्थानी कायम

वोल्व्हरहॅम्पटन – मोहंमद सलाहच्या चांगल्या खेळाच्या जोरावर लिव्हरपूल संघाने वोल्व्हरहॅम्पटनचा 2-0 असा पराभव करत ख्रिसमच्या सुट्टीच्यापूर्वी इंग्लीश प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थान कायम केले आहे. वोल्व्हरहॅम्पटनने भक्कम बचावाचा खेळ करण्याचा प्रयन्त केला. परंतु, त्यांना अपयश आले. वोल्व्हरहॅम्पटन लीगमध्ये सातव्या स्थानावर आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासून वोल्व्हरहॅम्पटनने बचावात्म खेळ केला. त्यामुळे पहिले 20 मिनिटे गोल होऊ शकला नाही. 22 व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या मोहंमद सलाहने बॉलला योग्य दिशा देत गोल नोंदवला. त्यानंतर वोल्व्हरहॅम्पटन संघाने अनेक आक्रमक चाली रचल्या पण गोल करण्यात आक्रमकपटूंमध्ये समन्वय नसल्याने त्यांना गोल करण्यात अपयश आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या सत्रामध्ये 68 व्या मिनिटाला वर्गील वान डिकने गोल करत लिव्हरपूलची आघाडी 2-0 केली. त्यानंतर गोल करण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले आणि हा सामना लिव्हरपूलने 2-0 जिंकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)