“भारत’मधून “जिंदा’ आऊट

सलमान खानच्या “भारत’मधून “जिंदा’ हे गाणे वगळण्यात आले आहे. हे गाणे बाद केले जाणार आहे असे सलमान खानने आपल्या ट्विटर अकाउंटवर चाहत्यांना सांगितले आहे. “एका एक्‍स्ट्रॉ ऑर्डिनरी माणसाच्या एक्‍स्टृऑ ऑर्डिनरी प्रवासाची कथा “जिंदा’ शिवाय बघायला या.’ असे सलमानने आपल्या ट्‌विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र आता “जिंदा’ “भारत’मधून बाद होणार असल्याने सलमानच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. मात्र सिनेमात सलमानच्या ऍक्‍शनला जास्त महत्व कायम रहावे, यासाठीच निर्मात्यांनी हे गाणे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

“जिंदा’ या दोन मिनिटांच्या गाण्यातील सिनेमातल्या सलमानच्या बालपणया काळापासूनचा आलेख दिसला असता. सिनेमात सलमानच्या वडिलांच्या रोलमध्ये जॅकी श्रॉफ आहे. 1947 साली देशाच्या फाळणीच्यावेळी कुटुंबीयांपासून वेगळे होण्याची पार्श्‍वभुमी या गाण्यात फ्लॅशबॅकदरम्यान बघायला मिळणार होती.

लहानपणच्या आठवणींनंतर सलमान नौदलातील खलाशी बनणे आणि कतरिना कैफच्या रुपाने प्रेयसी मिळण्यापर्यंतचा प्रवास “जिंदा हूं मै तुझमे, तुझमे रहूंगा जिंदा’ या गाण्यात दिसणार होता. ज्युलियस पॅकियामने या गाण्याला संगीत दिले होते. तर विशाल दादलानीने गायले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)