महापालिकेची स्वस्त आरोग्य सेवा ठरतेय जीवदायीनी

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा चांगलीच महागली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांसह त्यांच्या कुटुंबींयानाही बसत आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्याधुनिक अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून अवघ्या तीन महिन्यांत महापालिका प्रशासनाने सर्वसामान्य रुग्णांना तब्बल चार हजार रुग्णांचा एमआरआय केला असून आठशे रुग्णांची सोनोग्राफी केली आहे, ही सुविधा अल्पदरात उपलब्ध होत असल्याने त्याला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारची सुविधा पुरविणारी पुणे ही राज्यातील पहिलीच महापालिका होय.

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत प्रभावी प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या कुटुबिंयासाठी “शहरी गरीब योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून संबंधित कुटुंबांना वर्षाकाठी दोन लाख रुपयांचा वैद्यकीय लाभ मिळत आहे. मात्र, एमआरआय आणि सोनोग्राफी या महत्वाच्या तपासणीच्या संदर्भात महापालिका प्रशासन आणि महापालिका रुग्णालयांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना हजारो रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे अशी सुविधा सुरू करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात येत होती.

त्यामुळे या मागंणीची दखल घेऊन महापालिकेच्या स्थायी समितीच्या तत्कालिन अध्यक्षा अश्‍विनी कदम यांनी नऊ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. या निधीतून जर्मनीवरुन एमआरआय आणि सोनोग्राफीचे उच्च प्रतीचे मशीन मागविण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तांत्रिक माहिती असलेला कर्मचारी वर्गही याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

सर्वसामान्य रुग्णांना अल्पदरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात कमला नेहरु रुग्णालय आणि सुतार दवाखान्यात ही सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
– डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)