Live Score : रहाणे आणि पंत यांची अर्धशतके पूर्ण, भारत 4 बाद 271

वेस्टइंडिजचा पहिला डाव 311 वर आटोपला, भारत अजूनही 40 धावांनी मागे

हैदराबाद – काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्टइंडिज संघाच्या 7 बाद 295 धावा झाल्या होत्या. आज पुढे खेळताना कालच्या धावसंख्येत वेस्टइंडिज संघाला केवळ 16 धावांची भर टाकता आली आणि त्यांचा पहिला डाव 311 वर आटोपला. रोस्टोन चेज याने आज आपले शतक पूर्ण केले. तो 106 धावांवर बाद झाला.भारताकडून पहिल्या डावात उमेश यादव याने सर्वाधिक 6 तर कुलदीप यादव याने 3 तर रविचंद्रन आश्विन याने 1 बळी घेतला.

-Ads-

भारताने फलंदाजीला सुरूवात केली असून ताज्या माहितीनुसार भारताच्या 4 बाद 271 धावा झाल्या असून भारतीय संघ अजूनही 40 धावांनी मागे आहे. सध्या खेळपट्टीवर ऋषभ पंत हा 65 तर अंजिक्य रहाणे 60 धावांवर खेळत आहे.

भारताने 3 गडी गमावले असून लोकेश राहुल आणि चेतेश्वर पूजारा हे मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले. लोकेश राहुल 4 तर चेतेश्वर पूजारा 10 धावांवर बाद झाला. तर युवा फलंदाज पृथ्वी शाॅ याने 53 चेडूंत 70 धावा (11 चौकार,1 षटकार) केल्या. विराट कोहली हा 45 धावांवर बाद झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)