LIVE : स्वबळाच्या घोषणाचं ! अखेर भाजप शिवसेनेची युती

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि युती संदर्भात चर्चा केली. आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख यांनी स्वबळावर लढण्याचे सांगितले होते. तसेच सामनाच्या अग्रलेखातून देखील भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

आज मातोश्रीवर भाजपची जम्बो टीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गिरीश बापट,चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित होते. तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, दिवाकर रावते देखील हजर होते.  दरम्यान पत्रकार परिषदेला जाताना उद्धव ठाकरे, आदीत्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.

दरम्यान, देवेंद्र फडणीविस यांनी लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप एकत्रित असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी, गरिबांच हित तसेच राम मंदिर अनेक प्रश्नासाठी शिवसेना-भाजप एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना काही जागा सोडून राहिलेल्या जागा दोन्ही पक्ष समानतेने वाटून घेतील.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

 • लोकसभा विधानसभा एकत्र लढण्याबाबत दोन्ही पक्षांचे एकमत
 • अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी दोन्ही पक्ष आग्रही
 • शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला
 • राष्ट्रीय विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याच्या जनभावनेचा दोन्ही पक्षांनी आदर केला
 • हिंदुत्त्ववादाच्या विचारामुळे दोन्ही पक्ष 25 वर्षे एकत्र -मुख्यमंत्री
 • जनतेचा पाठिंबा असणाऱ्या ठिकाणीच प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेणार
 • नाणार प्रकल्पासाठी स्थानिकांच्या बाजूने उभे राहणार
 • कर्जमाफीसाठी तातडीने प्रक्रियेला सुरुवात करणार
 • कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणार
 • लोकसभा विधानसभा एकत्र लढण्याबाबत दोन्ही पक्षांचे एकमत
 • शेतकऱ्यांच्या समस्या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या ताताडीने सोडवण्याची गरज-उद्धव ठाकरे
 • शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हिंदुस्थान लेचापेचा नाही पाकिस्तानला लवकरच कळेल- उद्धव ठाकरे
 • स्थानिकांचा विरोध असल्याने नाणारमध्ये प्रकल्प नको, जनतेचा पाठिंबा असलेल्या ठिकाणी प्रकल्पाला सहमती
 • राममंदिर ही देशाची ओळख, लवकरात लवकर राममंदिर निर्माण करण्यासाठी एकमत

 

Ads

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)