Live : पालघर लोकसभा पोटनिवडणूक : भाजपचे राजेंद्र गावित विजयी

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक झाली.

23 व्या फेरी अखेर भाजपाच्या राजेंद्र गावित यांच्याकडे 31 हजार 616 मतांची आघाडी

सतराव्या फेरीनंतरही गावितांची आघाडी कायम; गावितांना 1 लाख 90 हजार 492 मतं, श्रीनिवास वनगा यांना 1 लाख 68 हजार 477 मतं; बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 1 लाख 42 हजार 350 मतं.

16 व्या फेरीनंतर गावित 1 लाख 79 हजार 344 मतांसह आघाडीवर; श्रीनिवास वनगा 1 लाख 56 हजार 757 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर

पंधराव्या फेरीनंतर राजेंद्र गावित यांच्याकडे 29 हजार 697 मतांची आघाडी

भाजपची घोडदौड सुरुच, राजेंद्र गावितांकडे मोठी आघाडी

पाचव्या फेरीनंतर शिवसेना तिसऱ्यावरुन दुसऱ्या क्रमाकांवर

भाजप उमेदवार राजेंद्र गावित 14236 मतांनी आघाडीवर

विक्रमगडमध्ये अपक्ष 2143 मतांनी आघाडीवर

डहाणूमध्ये भाजपचे राजेंद्र गावित 295 मतांनी आघाडीवर

बोईसरमध्ये शिवसेना १००० मतांनी पुढे

पोस्टल मतांमध्ये भाजपा आघाडीवर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)