शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर !

मुंबई: लोकसभा निवडणूक दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्यानांतर आता शिवससेनेने आपल्या २० स्टार प्रचारकांनी यादी जाहिर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे नाव सदर यादीमध्ये आहे. देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलला पार पडणार आहे.

शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीमध्ये, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम, अनंत गिते, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरै, आदेश बांदेकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे, सूर्यकांत महाडिक, विनोद घोसळकर, डॉ. निलम गोऱ्हे, लक्ष्मण वडले, नितीन बानगुडे-पाटील, वरुण सरदेसाई आणि राहुल लोंढे यांचा समावेश आहे.

https://twitter.com/ShivSena/status/1110834967377006592

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)