लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल! यादीत पार्थ पवारांनाही स्थान

२०१९ लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकांची रणधुमाळी प्रत्यक्ष मैदानावर सुरु होण्यापूर्वीच सोशल माध्यमांवर सुरु झाली असून विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा सोशल मीडियावर नेटाने प्रचार करताना दिसत आहेत. निवडणुकांचे वारे देशभरामध्ये जोराने वाहत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या या यादीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये २१ जागांवर लढणार असल्याचे दाखविण्यात आले असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मधून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या यादीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव त्यांचा पारंपरिक मतदार संघ बारामती येथे दाखविण्यात आले आहे तर हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांचं नाव देण्यात आलं आहे. ही यादी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असली तरी व्हायरल झालेल्या या यादीच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोशल माध्यमांवर व्हायरल झालेली यादी :

राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक संभावित उमेदवार यादी

1) बारामती – सुप्रिया सुळे
2) कोल्हापूर – धनंजय महाडिक
3) सातारा – उदयनराजे भोसले
4) मावळ – पार्थ पवार
5) रायगड – सुनील तटकरे
6) औरंगाबाद – सतीश चव्हाण
7) परभणी – राजेश विटेकर
8) बुलढाणा – राजेंद्र शिंगणे
9) भंडारा गोंदिया – वर्षा पटेल / मधुकर कुकडे
10) रावेर – संतोष चौधरी
11) शिरूर – विलास लांडे
12) जळगाव – अनिल भाईदास पाटील
13) नाशिक – समीर भुजबळ
14) ठाणे – संजीव नाईक
15) बीड – अमरसिंह पंडित
16) उस्मानाबाद – राणा पाटील /अर्चना पाटील
17) ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील
18) दिंडोरी – धनराज महाले
19) माढा – विजयसिंह मोहिते
20) हातकणंगले – राजू शेट्टी
21) नगर दक्षिण – डॉ. सर्जेराव निमसे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)