आंध्र प्रदेशातील भाजपच्या १२३ उमेदवारांची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने देशभरामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशातील आंध्र प्रदेश, अरुणाचल, ओडिशा आणि सिक्कीम या चार राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित होणार आहेत. या चार राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याने येथील राजकीय हालचालींना भलताच वेग आला आहे.

याचं पार्श्वभूमीवर आज भाजपाद्वारे आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी १२३ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत पक्षाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली असून या पत्राद्वारे निवडण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावांवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काल दिल्ली येथे भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जेष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

https://twitter.com/ANI/status/1107251261798264833

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)