मद्य माफियांनी उपनिरीक्षकाला ट्रक खाली चिरडून मारले 

चंद्रपुर जिल्ह्यातील प्रकार 

नागपुर: मद्य माफियांनी एका पोलिस उपनिरीक्षकाला गाडीखाली चिरडून ठार मारल्याचा प्रकार आज सकाळी चंद्रपुर जिल्ह्यात घडला. छत्रपती चिडे असे ठार झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते नागभीड ठाण्यात कार्यरत होते. ते आपल्या अन्य चार सहकाऱ्यांसह गोसीखुर्द कॅनाल रस्त्यावर वाहनाची तपासणी करीत असताना त्यांना भरधाव वेगाने येणारी एक एसयुव्ही गाडी दिसली. त्यांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही. त्यांनी तिचा पाठलाग केल्यानंतर ही गाडी थांबली पण चालकाने गाडी रिव्हर्स घेत ती उपनिरीक्षकाच्या अंगावर घातली. त्यात उपनिरीक्षक ठार झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेनंतर एसयुव्ही चालक गाडी तशीच भरधाव वेगाने पुढे घेऊन गेला आणि तो फरारी झाला. ही गाडी मद्य माफियाची होती. बेकायदा दारू वाहतुकीची तपासणी करण्यासाठीच हे पथक तेथे कार्यरत होते अशी माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. चंद्रपुर जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक गोसीखुर्द कॅनाल रोडवरूनच होते अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे ही पाळत ठेवली होती. चंद्रपुर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुर्ण दारूबंदी आहे. त्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा दारू विक्री केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)