लियोनेल मेस्सी बार्सेलोनाचा कर्णधार!!!

‘मोअर दयान अ क्लब’ असे बिरूद असणाऱ्या बार्सेलोना संघाने  यंदाच्या नवीन मोसमासाठी आपल्या संघाचे चार कर्णधार जाहीर केले. बार्सेलोना संघाचा सर्वांत महत्वाचा आणि भरवशाचा शिलेदार लियोनेल मेस्सी हा यंदाच्या वर्षांपासून बार्सेलोनाचा मुख्य कर्णधार असेल. २०१५ पासून लियोनेल मेस्सी हा बार्सेलोनाचा उपकर्णधार होता.

बार्सेलोना संघाने काल आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून आपल्या चार कर्णधारांची त्यांच्या क्रमानुसार नावे जाहीर केली. लियोनेल मेस्सी, सर्जिओ बुस्केट, जेराड पिके आणि सर्जिओ रॉबेर्टो. विशेष बाब म्हणजे हे चार खेळाडू बार्सेलोना  युथ अकॅडमी ‘ला मासीया’ चे प्रोडक्ट आहेत. त्यांनी आपल्या फुटबॉलचे धडे या क्लबच्या आवारात घेतले आहेत. चारही कर्णधार ‘ला मासीया’चे असल्याने बार्सेलोना समर्थकांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण आहे.

-Ads-

लियोनेल मेस्सीला कर्णधारपदाचा चांगलाच अनुभव आहे. तो अनेकवेळा बार्सेलोना संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. परंतु, पूर्ण वेळ कर्णधार आणि पूर्ण मोसमासाठी  बार्सेलोनाचा कर्णधार होण्याची त्याची ही पहिलीच वेळ. मेस्सी आपला राष्ट्रीय संघ अर्जेन्टिनासाठी पूर्णवेळ कर्णधाराची भूमिका बजावत असतो. त्याने कर्णधार आणि खेळाडू म्हणून सलग तीन मोठ्या स्पर्धांमध्ये अर्जेन्टिनाला अंतिमसंन्यात पोहचवले होते. त्यात २०१४ विश्वचषक तर अन्य दोन हे कोपा अमेरिका चॅम्पियनशीप स्पर्धा होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)