इंडोनेशियात लायन एयरचे विमान कोसळून 189 ठार 

जकार्ता –  इंडोनेशियात लायन एयरचे विमान कोसळून प्रवासी आणि चालक दलासह 189 जण मरण पावल्यची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 6. 20 वाजता लायन एयरच्या बोइंग़ 707-800 या विमानाने जकार्ता विमानतळावरून पांगकल पिनांगला जाण्यासाठी उड्डाण केले होते.

या फ्लाइट क्रमांक 610 मध्ये 3 मुलांसह 181 प्रवासी आणि 8 चालक दलाचे सदस्य होते. प्रवाशांमध्ये किमान 23 सरकारी कर्मचारी, मायनिंग कंपनी पीटीटी इमाहचे 4 आणि तिच्या सहयोगी कंपनीचे 3 कर्मचारी, आणि एक इटालियन प्रवासी होता. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला. राष्ट्रीय शोध आणि बचाव कार्य करणाऱ्या एका जहाजानेच विमान कोसळताना पाहिले. विमान कोसळून समुद्रात बुडाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम जावाजवळ विमान कोसळले, त्या ठिकाणी सागराची खोली 30 ते 35 मीटर्स (98 ते 115 फूट) आहे. विमानातील इंधन समुद्रात पसरल्याचे आणि विमानाच्या काही अवशेषांचे फोटो इंडोनेशिया टेलिव्हिजनने दाखवले आहेत. विमानातील काही सामान आणि प्रवाशांच्या मृतदेहांचे अवशेषही मिळाले आहेत. विमानाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पाणबुडे प्रयत्न करीत असल्याची माहिती एनएसआरए चे प्रवक्ते मुहम्मद स्याऊगी यांनी दिली आहे. शोधमोहिमेत हवाई दलाचीही मदत घेण्यात आलेली आहे.

या उड्डाणापूर्वी बाली ते जकार्ता या उड्डाणादम्यान विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता, मात्र तो दूर करण्यात आला होता, असे लायन एयर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एडवर्ड सिरियात यांनी सांगितले. एयर लायन ही इंडोनेशियातील सगळ्यात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एके कंपनी आहे.

लायन एयरच्या दुर्घटनाग्रस्त बोइंग 737 मॅक्‍स 8 विमानाचे पायलट भव्य सुनेजा (31) हे भारतीय असून गेली 7 वर्षे लायन एयरच्या सेवेत होते. बेल एयर इंटरनॅशनलमध्ये पायलटचे प्रशिक्षण घेतलेल्या सुनेजांना विमानोड्डाणाचा 6,000 तासांचा अनुभव होता. लायन एयरपूर्वी त्यांनी काही महिने अमिरात मध्ये काम केले होते. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)