धोकादायकरित्या विजेच्या खांबाला आग

पिंपरी – मोहननगर येथील स्पॅको टेक्‍नोलॉजीस या कंपनीजवळील वीजपुरवठा करणाऱ्या खांबाला गुरुवारी (दि.11) सकाळी अचानक आग लागली. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली होती. मात्र. या आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.

वीजपुरवठा करणाऱ्या खांबांवर अचानक आग दिसू लागल्याने स्थानिक रहिवासी गणेश बाबर यांनी घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. यामुळे काही वेळातच तेथे अग्निशमन विभागाचे जवान आणि महावितरणचे कर्मचारी पोहचले. चर्चेनंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी स्पॅको कंपनीतील कर्मचारी, मोहननगर पोलीस चौकीतील कर्मचारी आणि स्थानिकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)