जीवन सहज, सुंदर , निरोगी करणारे ‘राजयोगा मेडिटेशन’

डॉ. महेश मुळे: पुढील बॅच 27 मे रोजी

नगर: येथील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत प्रिव्हेंटीव्ह कार्डीओलॉजी डिपार्टमेंट द्वारा घेण्यात आलेल्या राजयोगा मेडिटेशन कोर्सच्या समारोप प्रसंगी डॉ महेश मुळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समवेत स्पोर्ट शिक्षक श्री संजय धोपावकर, नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, मेडिटेशन सेंटरच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया उपस्थित होते. डॉ. मुळे म्हणाले की, आजकालचे जीवन धावपळीचे व गुंतागुंतीचे झाले आहे त्याला सहज सुंदर करण्यासाठी सर्वांनी राजयोगा मेडिटेशनचा लाभ घ्यावा. राजयोगा मेडिटेशनचे फायदे जगमान्य आहेत त्यामुळे आपली रोगप्रतिकर शक्ती वाढते, मन सशक्त होते, विविध आजारांवर सहज मात करता येते त्यात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, मानसिक आजार यांचा समावेश करता येईल. तसेच अचानक उद्भवणार्या विविध प्रकारच्या संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य या राजयोगा मेडिटेशन द्वारे प्राप्त होते असे ही ते म्हणाले.

संजय धोपावकर यांनी ही मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की खेळामध्ये एकाग्रता, अटेंशन, वेळेचे भान, विविध कौशल्याची आवश्‍यकता असते व या सगळया गोष्टी आपल्याला राजयोगा मेडिटेशन द्वारे प्राप्त होतात. मी स्वत: या मेडिटेशनचा अनुभव घेतला आहे. सर्वांनी याचा लाभ जरूर घ्यावा.

7 दिवसीय राजयोगा कोर्समध्ये सुमारे 150 व्यक्तींनी भाग घेतला त्यापैकी जणांनी आपले अनुभव व्यक्त केले. काहींची वाढलेली रक्तातील साखर नॉर्मल झाली, उच्च रक्तदाब अटोक्‍यात आला, रागावर नियंत्रण आले. सर्वेष लढ्ढा या लहान मुलाचा बालदमा 70 टक्‍क्‍यांनी कमी झाला, मानसिक आजार असलेल्या रूग्णांना दिलासा मिळाला. हृदयरोगी रूग्णामध्ये सकारात्मक बदल दिसून आला, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाले.

या प्रसंगी डॉ. सुधा कांकरिया यांनी स्वागत केले. राजयोगा मेडिटेशनवर झालेले संशोधन विशद केले जितना करोगे, उतना पाओगे या धरतीवर सकारात्मक बदल होत असतात. तरी सर्वांनी मेडिटेशन करण्यात सातत्य व निरंतरता ठेवावी असे सांगितले व पुढील कोर्स 27 मे पासुन पुढील सात दिवस रोज रात्री 8.30 ते 10 या कालावधीत आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर येथे संपन्न होईल. सदर कोर्स संपूर्णत: मोफत असून त्यासाठी नांवनोंदणी 23 मे पूर्वी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. नावनोंदणीसाठी प्रिया दिदी , दत्तात्रय वाडकर यांच्याकडे लवकरात लवकर संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)