जीवनविमा की टर्म इन्शुरन्स? (भाग-२)

जीवनविमा की टर्म इन्शुरन्स? (भाग-१)

विमा कालावधी कमी
आरओपी प्लॅनमध्ये विमा कवचचा कालावधी हा साधारण टर्म प्लॅनच्या तुलनेत कमी असतो. साधारण टर्म प्लॅनमध्ये कंपन्या 40 ते 45 वर्षांचे कवच देते. त्याचवेळी आरओपी प्लॅनमध्ये हा कालावधी 20 ते 25 वर्षांचा राहतो.

कोणता पर्याय चांगला
अर्थतज्ज्ञांच्या मते, आरओपीच्या ऐवजी साधारण टर्म पॉलिसी घेणे फायदेशीर ठरू शकते. साधारण टर्म पॉलिसीत कमी हप्ता भरून उर्वरित रक्‍कम ही पीपीएफ, एसआयपी, रिकरिंग, मुदत ठेवी यात ठेऊन चांगला परतावा मिळवू शकतो.

अधिक शुल्क आकारणी
आरओपी प्लॅनमध्ये कंपन्या हप्ता परत करण्यासाठी देखील शुल्काची आकारणी करतात. त्याचवेळी साधारण टर्म पॉलिसीमध्ये अशा प्रकारचे कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

ऑनलाईन विमा खरेदी
विमा एंजटच्या तुलनेत ऑनलाइन टर्म प्लॅन खरेदी करणे हे फायदेशीर आहे. कारण ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन टर्म प्लॅन खरेदी करणे 25 टक्‍क्‍यांपर्यत स्वस्त असू शकते. आपण संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन विमा पॉलिसी खरेदी करू शकतो. याप्रमाणे आपण मोठी रक्कम बऱ्यापैकी वाचवू शकतो आणि हप्ताही कमी बसतो.

– अभिलाषा चांदोरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)