जीवनविमा की टर्म इन्शुरन्स? (भाग-१)

टर्म इन्शूरन्स योजना ही जीवन विमा पॉलिसीपेक्षा उत्तम आणि परवडणारे साधन आहे. अन्य विमा योजनांच्या तुलनेत टर्म पॉलिसी स्वस्त आहे. कारण या योजना विमा आणि गुंतवणूक यांच्यात रसमिसळ करत नाही. मात्र हप्त्यावर परतावा मिळत नसल्याने बहुतांश नागरिक या अशा प्रकारच्या पॉलिसीकडे पाठ फिरवतात. यानुसार आज अनेक विमा कंपन्यांनी हप्ता परत करणारी टर्म प्लॅन (रिटर्न ऑफ प्रिमियम) म्हणजेच आरओपी सादर केली आहे. यानुसार पॉलिसी परिपक्व झाल्यानंतर हप्त्याची रक्कम परत विमाधारकाला दिली जाते. अशा स्थितीत पॉलिसीची निवड करण्यावरून ग्राहकाची द्विधा मनस्थिती होऊ शकते. साधारण टर्म पॉलिसी घ्यावी की हप्ता परत करणारी पॉलिसी घ्यावी यामध्ये आपण गोंधळतो. मात्र अर्थतज्ज्ञांच्या मते, साधारण टर्म प्लॅन हा फायदेशीर ठरू शकतो.

गुंतवणूक आणि विमा वेगळे ठेवा: टर्म प्लान हे काय गुंतवणुकीचे साधन नाही. ही एकप्रकारची शुद्ध स्वरूपातील विमा योजना आहे. यासाठी जर टर्म प्लान खरेदी करायचा असेल तर केवळ टर्म प्लॅनच खरेदी करा. हप्ता परत करणाऱ्या प्लॅनच्या प्रेमात पडू नका.

जीवनविमा की टर्म इन्शुरन्स? (भाग-२)

अनेक पटीने हप्ता
जर आपण साधारण टर्म पॉलिसी न घेता आरओपी पॉलिसी घेत असाल तर आपल्याला विम्याच्या कालावधीदरम्यान अनेक पटीने हप्ता भरावा लागतो. जर एखादा 35 वर्षांचा व्यक्ती एक कोटी रुपयाचा साधारण टर्म प्लॅन 20 वर्षांसाठी घेत असेल तर त्याला 9 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागेल. मात्र त्याने आरओपी योजना घेतली तर त्याला 30 हजारांपर्यंत हप्ता भरावा लागेल. वयाच्या 18 व्या वर्षापासून वयाच्या 65 पर्यंत टर्म प्लॅन खरेदी करू शकता. टर्म इन्शुरन्स पॉलिसी ही किमान पाच वर्षांसाठी खरेदी करू शकतो. टर्म प्लॅनमध्ये विमा कवच हे आपल्या उत्पन्नाच्या दहा पट अधिक असायला हवे.

– अभिलाषा चांदोरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)