चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप

नगर- अवघ्या पावणेतीन वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी नैसर्गिक मरेपर्यत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.

शहरातील रेल्वे उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या मजूर कुटुंबातील बालिकेचे आरोपी बाळू बर्डे याने 8 डिसेंबर 2016 च्या रात्री अपहरण करून तिला केडगाव येथील औद्योगिक वसाहतीत आणले. या ठिकाणी त्याने बालिकेवर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला. अत्याचारानंतर बालिकेला घटनास्थळी सोडून बर्डे फरार झाला. एका कामागाराने त्या बालिकेला पाहिले. तेव्हा याबाबत कोतवाली पोलीसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याबाबत पोलीस कॉस्टेबल प्रभावती कोकाटे यांनी 9 डिसेंबर 2016 रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पीडित बालिकेच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात आला. अत्याचार करणारा आरोपी मात्र मागे काहीच पुरावा न ठेवता पसार झाला होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरिक्षक संदीप पाटील यांनी तब्बल एक महिना तपास करून आरोपी बर्डे याला नगर येथून ताब्यात घेतले.

याबाबत पाटील यांनी 27 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड. अर्जुन पवार यांनी हा खटला लढविला. या खटल्यात एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याचे अंतीम टप्प्यातील कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्यासमोर चालले गेल्या शुक्रवारीच आरोपीला या गुन्ह्यात दोषी धरण्यात आले होते. त्यानुसार आज ही शिक्षा सुनावण्यात येणार असल्याने न्यायालयाच्या आवारात गर्दी होती. न्यायालयाने बर्डे याला मरेपर्यंत जन्मठेपेशी शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)