अलकायदाच्या येमेन मधील म्होरक्‍याचा खात्मा

वॉशिंग्टन: अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या येमेन मधील म्होरक्‍याचा खात्मा करण्यात अमेरिकेन लष्कराला यश आले आहे. अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला आहे. जमाल अल बदावी असे या म्होरक्‍याचे नाव आहे. त्याने अमेरिकन नौदलाच्या युएसएस कोल नावाच्या एका युद्धनौकेवर 12 ऑक्‍टोबर 2000 मध्ये हल्ला केला होता. त्यात अमेरिकन नौदलाचे 17 जण ठार झाले होते तर चाळीसहून अधिक जण जखमी झाले होते. त्या घटनेपासूनच अमेरिकेचे लष्कर जमाल अल बदावीच्या मागावर होते. अखेर त्याला टिपण्यात यश आले आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या यशाबद्दल अमेरिकन लष्कराचे आभार मानले आहे. अमेरिकन नौदलाच्या जहाजावर झालेल्या हल्ल्यात ज्या शूर अमेरिकन नौसैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांना या निमीत्ताने न्याय मिळाला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आज त्यांचा केवळ म्होरक्‍या ठार झाला आहे पण आम्ही इस्लामिक कट्टरपंथीय दहशवाद्यांची यापुढील लढाईही अधिक जोमाने लढणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)