लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी घेतला काश्‍मीरातील सुरक्षेचा आढावा 

श्रीनगर: लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीरिंसंग यांनी आज काश्‍मीरातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील दहशतादी घटना आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेली उपाययोजना तसेच घुसखोरीच्या बाबतीत करण्यात आलेल्या उपायोजनांच्या संबंधातही त्यांनी माहिती घेतली.

लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले की लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दक्षिण काश्‍मीर मधील काहीं सीमावर्ती ठाण्यांमध्ये जाऊन तेथील स्थितीची माहिती घेतली. त्यांनी लष्कराच्या काही छावण्यांनाही भेट दिली. दक्षिण आणि मध्य काश्‍मीरातील दहशतवाद्यांच्या विरोधातील प्रभाव कारवाईबद्दल त्यांनी आपल्या लष्करी जवानांचे आणि अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. नागरी जीविताची कमीतकमी हानी होईल याकडे लक्ष देऊन लष्करी जवानांनी ज्या धैर्याने दहशतवाद्यांच्या आव्हानाचा मुकाबला केला आहे ते कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. काश्‍मीरात सुरक्षा आणि शांतता कायम राखण्यासाठी लष्कर या राज्यात मोठे योगदान देत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)