आयडीबीआयचे भांडवल खरेदी करण्यास एलआयसीला परवानगी

नवी दिल्ली: आडीबीआय बॅंकेचे 51 टक्‍के भागभांडवल खरेदी करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने एलआयसीला तशी परवानगी दिली आहे. त्यामुळे आज शेअरबाजारात आयडीबीआय बॅंकेच्या शेअरचा भाव 6 टक्‍क्‍यापर्यंत वाढला.
एलआयसीकडे आयडीबीआय बॅंकेअगोदर 7.5 टक्‍के शेअर आहेत. आता लवकरच आणखी शेअर एलआयसी खरेदी करणार असल्याचे सांगितले जाते. या व्यवहाराला एलआयसीच्या आणि बॅंकेच्या कर्मचाऱ्याचा विरोध आहे. मात्र सरकारने आपल्या भूमिकेत आतापर्यंत कसलाही बदल केलेला नाही. खराब कर्जामुळे आयडीबीआय बॅंकेचा ताळेबंद बिघडला आहे.
या कारणामुळे बॅंकेला मोठी भांडवली मदत मिळणार आहे. मात्र याचा एलआयसीच्या ताळेबंदावर परिणाम होणार असल्याचे एलआयसीच्या कामगारांचे म्हणने आहे. या व्यवहारानंतर एलआयसीला बॅंकिंग क्षेत्रात उतरता येईल असे बोलले जात आहे. त्यामुळे बॅंकेच्या शाखातून एलआयसीला आपली काही वित्तीय उत्पादने विकता येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यासाठी विमा कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे.
आयडीबीआय बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या बॅंकेच्या कर्ज वितरणाबरोबरच दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. या व्यवहारामुळे आयडीबीआय बॅंक पुन्हा कामकाज सुरू करू शकणार असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)