लिबीयाच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला

त्रिपोली (लिबीया) : लिबीयाची राजधानी त्रिपोलीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयावर आज दहशतवाद्यांचा सशस्त्र हल्ला झाला. यावेळी झालेल्या जोरदार धुमश्‍चक्रीमध्ये किमान तिघेजण ठार झाले आणि 10 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी पररष्ट्र मंत्रालयाच्या आवारात काही बॉम्बस्फोटही घडवून आणले, विदेश मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने लिबीयाच्या सरकारी न्यूज चॅनेलने म्हटले आहे. हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीतून धूर आणि ज्वाळा येत असल्याचे काही साक्षीदारांनी सांगितले.

लिबीयामधील यादवीचा सत्तासंघर्ष आणि सातत्याने असलेले असुरक्षिततेचे वातावरण यामुळे तेथे जिहादी गटांचे प्राबल्य खूप वाढले आहे. लिबीयाचे सर्वेसर्वा मोहंम्मद गद्दाफीना 2011 मध्ये बंडखोरांनी ठार मारल्यापासून तेथील इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांनी 2015 मध्ये किनारपट्टीजवळील सिर्त शहरामध्ये पाय रोवले आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)