पुण्यातील कॉंग्रेस नेत्यांचे राहूल गांधी यांना पत्र

निष्ठावानाच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू

पुणे –
पुण्याला ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवारही तसाच योग्य आणि लोकांना भावणारा असला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत पुण्यासाठी उमेदवार देताना कॉंग्रेसने “विनिंग कॅंडिडेट’बरोबरच निष्ठावान कार्यकर्त्याचा विचार करावा. कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही सगळे एकजुटीने उभे राहून काम करू, अशा विनंतीचे पत्र पुण्यातील कॉंग्रेस नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवले आहे.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गोपाळ तिवारी आणि बाळासाहेब शिवरकर यांनी एकत्र येऊन पक्षाध्यक्ष राहूल गांधी, ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मल्लीकार्जून खर्गे, वेणूगोपाल व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व इतर श्रेष्ठींना पुण्याच्या उमेदवारीबाबत विनंतीपत्र, निवेदन दिले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीविषयी अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने, माध्यमातून उलटसुलट चर्चा होत आहेत.

-Ads-

परिणामी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होत असून, निष्कारण पक्षास मारक वातावरण तयार करण्याचा काही वृत्तींकडुन प्रयत्न होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे महत्त्व आणि गांभीर्य ओळखून कोणीही व्यक्तीगत महात्त्वाकांक्षेस प्राधान्य न देता कॉंग्रेसची देशहीताची बांधीलकी डोळ्यासमोर ठेऊन कॉंग्रेस उमेदवारासाठी कार्यकर्ते अथक प्रयत्न करतील व पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम एकजुटीने करतील, असा विश्‍वासही या पत्राद्वारे गोपाळ तिवारी व नेत्यांनी केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)