पत्रसंवाद: वाळू मिश्रित खडींमुळे जीवित हानी…

ललित आगवणे

वाळू मिश्रित खडींमुळे अपघातातमध्ये वाढ होत असून याला जबाबदार कोणाला धरायचं, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
दिवसेंदिवस लोकसंख्येचे प्रमाण वाढत असताना, खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी उत्तम आहे. परंतु वेळेवर सार्वजनिक वाहतूक मिळत नाही, त्यात सार्वजनिक वाहतुकीची वाहने रस्त्यात वारंवार बंद पडतात. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर वाढतो आहे. परंतु वाहन चालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. त्यात वारंवार रस्ते खोदणे-बनविणे, फूटपाथ बनविणे या कामांमुळे धुळीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यात सतत वाळूमिश्रित खडी रस्त्यावर पडलेली असते.

-Ads-

त्यामुळे दुचाकी वाहन चालकाने गर्दीत ब्रेक दाबला की, या खडीवरून घसरून जीवितहानी किंवा अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शासन-प्रशासन लोकप्रतिनिधींनी या गोष्टी गांभीर्याने न घेतल्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे दिवसेंदिवस धोक्‍याचे होत आहे. गर्दीच्या, वर्दळीच्या ठिकाणी तर या वाळूमिश्रित खडीवरून गाडी घसरून पडणार, यामध्ये नाहक पादचाऱ्यांचा बळी जातो. या होणाऱ्या घटना राष्ट्रहित, समाजासाठी घातक असताना. फक्त महसूल गोळा कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित असते.

शहरामध्ये ज्या ठिकाणी वाळूमिश्रित खडी पसरली आहे, ती गोळा करून या घटना आटोक्‍यात आणू शकतो. त्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती, नियोजन असले पाहिजे. नाहीतर पुन्हा वाळूमिश्रित खडी गोळा करण्याचे कॉन्ट्रॅक्‍ट ठेकेदाराला देऊन चिरीमिरीचा फायदा पाहिला जाईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)