वेळे उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करू

ना. नितीन गडकरी : मुंबईतील बैठकीत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन

भुईंज – वेळे, ता. वाईयेथे महामार्गावर सुमारे 26 जणांचा बळी गेले होते. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपुलास मंजुरी देवून काम लवकरात सुरू व्हावे, याबाबत दै. प्रभातमधून वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा करण्यात आला होता. त्यास यश आले असून उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू करण्याची ग्वाही ना. नितीन गडकरी यांनी दिली. वेळे ग्रामस्थ आणि भाजपच्या शिष्टमंडळाची मुंबईत उड्डाणपुलाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

वेळे येथे महामार्गावर उड्डाणपुलाची नितांत गरज आहे. आजवर येथे अनेक भीषण अपघात होऊन अनेकजण मृत्यूमुखी पडले तर शेकडोजण जायबंदी झाले. वास्तविक पाहता शिरवळ ते सातारा यादरम्यान फक्त वेळे हे गाव उड्डाणपुलापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. तसेच सुट्टी दिवशी हा महामार्ग गजबजलेलाच असतो. त्यामुळे येथील स्थानिक लोकांना याचा मनःस्ताप मोठ्या प्रमाणात होतो.

रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो नाहीतर अपघातास सामोरे जावे लागते. महामार्गावर झालेल्या आजपर्यंत अपघातांच्या मालिकेत 26 जणांचा बळी गेल्याने त्याची धग वेळे गावाच्या उंबरठ्यावर पोहोचली. या उड्डाण पुलाला विरोध करणाऱ्यांनी एकत्र येऊन पूल उभा करण्यासाठी ताकद उभी करावी, यासाठी दै. प्रभातने आवाज उठवला होता.

दरम्यान, वेळे गावातील ग्रामस्थ आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे, अशोक कदम, अभिनव पवार, दत्तात्रय पवार, दिपक पवार, गणेश जाधव यांसह सरपंच दशरथ पवार, राहुल ननावरे, शरद पवार या शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुलाच्या आवश्‍यकतेबाबत ना. गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी ना. गडकरी यांनी पुलाचे काम लवकरात लवकर सुरू, असे आश्‍वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)