क्राईस्टचर्च दहशतवाद्याला निनावी राहू द्या – न्यूझीलंड पंतप्रधान 

क्राईस्टचर्च (न्यूझीलंड) – क्राईस्टचर्च दहशतवाद्याला निनावी राहू द्या, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे. क्राईस्टचर्च येथील मशिदींमध्ये अदांधुंद गोळीबार करून 50 जणांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्याचे नाव आपण उच्चारणार नाही, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्ह्टले आहे. शुक्रवारी क्राईस्ट्‌चर्चमधील दोन मशिदींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न प्रथमच संसदेत बोलत होत्या, या हल्ल्यातील दहशतवाद्यांवर न्यूझीलंडमधील कायद्यांनुसार कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल याचा त्यांनी विश्‍वास दिला.

अस-सलाम आलेकूम-म्हणजे तुम्हा सर्वांना शांती लाभो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
दहशतवाद्यांनी हल्ला करून अनेक गोष्टी साधण्याचा प्रयत्न केला आहे.आणि अशा कृतीने प्रसिद्धी, खरं तर कुप्रसिद्धी मिळवणे या त्यातील एक प्रमुख हेतू आहे. पण आपण न्यूझीलंडवासी तसे होऊ देणार नाही. त्याचे नावसुद्धा आपण घेणार नाही. त्याला निनावी, अज्ञात राहू द्यावे असे त्यांनी सांगितले.

वकील न घेता आपली केस स्वत:च लढवण्याच्या दहशतवाद्याच्या निर्णयाबाबत वेलिंग्टनमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत त्यांनी सांगितले की असे करून स्वत:च्या राजकीय मतांचा प्रचार करण्याचा त्याचा हेतू आहे. ब्रेंटन टॅरंट (28) या ऑस्ट्रेलियन युवकावर खुनांचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. शनिवारी त्याला क्राईस्टचर्च जिल्हा दंडाशिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. देशातील शस्त्रात्र कायद्यात लवकरच बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)