तणमोरांचेही आस्तित्त्व पुसले जाण्याची भीती

उपाययोजना सुरू : गेल्या 15 वर्षांत 80 टक्‍क्‍यांनी घटली संख्या

राज्यातील तणमोरांच्या नोंदींसाठी विशेष सर्वेक्षण

-Ads-

पुणे – माळढोकपाठोपाठ तणमोर हा पक्षीदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 15 वर्षांत देशातील तणमोर पक्ष्याची संख्या तब्बल 80 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. वनविभाग आणि पक्षीप्रेमींसमोर हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच या पक्षाच्या नोंदी घेऊन त्यांच्या संवर्धनाबाबत उपाययोजना आता वनविभागाने हाती घेतल्या आहेत.
आता राज्यातील तणमोरांची विशेष गणना केली जाणार आहे. देशभरातील लुप्त होत असलेल्या वन्यजीवांची माहिती घेण्यासाठी डेहराडून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे विशेष सर्वेक्षण घेण्यात येत आहे. यामध्ये माळढोक आणि तणमोर या पक्षांचादेखील समावेश आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूटसोबत वनविभागदेखील या सर्वेक्षणात सहभागी होणार आहे. महत्वाचे म्हणजे हे सर्वेक्षण संपूर्ण भारतात केले जाणार असून अशाप्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे, असे पुण्याचे वन्यजीव संरक्षक आर. के. वानखेडे यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी आवश्‍यक प्रशिक्षण वन विभागाच्या निरीक्षकांना देण्यात येत आहे.

आतापर्यंत विभागस्तरावर झालेल्या सर्वेक्षणात तणमोरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पुढे आले आहे. संपुष्टात येणारे गवताळ प्रदेश, विजेच्या तारा, स्थानिक कुत्र्यांचा त्रास यामुळे हे पक्षी नामशेष होत असल्याचे निरीक्षणांमधून समोर आले आहे.

असे असेल सर्वेक्षण
देशभरत होणाऱ्या या सर्वेक्षणात वनविभागाच्या निरीक्षकांना दि. 4 ते 22 ऑगस्टदरम्यान प्रशिक्षण दिले जात आहे. यानंतर हे निरीक्षक नेमून दिलेल्या ठिकाणांवर सलग 15 दिवस तणमोरांबाबत नोंदी घेतील. यात पुणे विभागातील पुणे, सोलापूर, जुन्नर आणि भोर अशा ठिकाणच्या सर्व 25 “रेजेंस’वर हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

ही आहेत तणमोरांची वैशिष्ट्ये
गवताळ प्रदेशात आढळणाऱ्या या पक्ष्याचा रंग गवतासारखाच असल्याने सहजासहजी तो दिसत नाही. मात्र, सध्या या पक्ष्यांचा मिलन काळ असल्याने हा तणमोर गवतातून बाहेर पडतो. तसेच उंच उडून आवाज काढत असतो. त्याच वेळी या पक्ष्याची नोंद घेतली जाते. हे पक्षी मुख्यत्वे पहाटे आणि सायंकाळी दिसतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)