गोपाळपुरमध्ये बिबट्याची दहशत

दोन शेळ्यावर हल्ला, पिंजरा लावण्याची होतेय मागणी

गोपाळपुर – नेवासा तालुक्यातील गोपाळपुर येथे काल रात्री बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला .यामुळे गोपाळपुर मध्ये बिबट्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन वेळेत पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-Ads-

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल रात्री गोपाळपुर येथील आप्पासाहेब खनसे यांच्या वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्यावर हल्ला केला. यातील एक शेळी त्याने जवळील ऊसात ओढून नेली.तर एकीचा शेडमध्ये जीव घेतला. यामुळे गोपाळपुर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गोपाळपुर हे जायकवाडी बँकवाटर परिसरातील गाव असल्याने हा भाग पाण्याचा आहे. ऊस, केळी पिके घेतली जातात. यामुळे या परिसरात बिबट्याला वास्तवासाठी चांगले वातावरण असते. रात्री वीज असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते. यामुळे वन खात्याने वेळेत पिंजरा लावून बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.दरम्यान काल दुपारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर काळे व वन विभागाचे पाठक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
47 :thumbsup: Thumbs up
21 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
28 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)