शिराळा तालुक्‍यात बिबट्याची दहशत

संग्रहित छायाचित्र

वनखात्याला आव्हान

शिराळा – सातारा-सांगली सरहद्दीवरील शिराळा तालुक्‍यातील वाकुर्डे बुद्रुक व वाकुर्डे खुर्द येथे दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिराळा तालुक्‍यातील वाकुर्डे खुर्द येथे साईनाथ गुंगा पाटील यांच्या शेडमधील शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारले. शेजारी असणाऱ्या वासराला जखमी केली व शेडची कच्ची िंभंत पाडून तेथून पोबारा केला. साईनाथ पाटील सकाळी जनावरांना वैरण घालण्यासाठी गेले असता शेळी मृतावस्थेत तर वासरू जखमी अवस्थेत आढळून आले. तर दोन कोकरे गायब झालेली आहेत. शेड परिसरात बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले.

यावेळी वनपाल बी.डी.मुदगे, वनरक्षक पी.एन.पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व आढळलेले ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. वाकुर्डे बुद्रुक येथील मानेवाडीतील बामणकी येथे वसंत शंकर माने यांच्या घराशेजारील शेडमधील शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून वसंत माने शेडमध्ये गेले असता शेळी मृत अवस्थेत आढळून आली. तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढला होता.

त्याचदिवशी सायंकाळी शिवाजी माने यांना मानेवाडीला जात असतांना झाडावर बिबटयाचे पिल्लू आढळले. त्यांनी गावाकडे पळत येऊन ही बाब नागरिकांना सांगितली. बिबट्याचे पिल्लू येथे आहे म्हणजे मादी जवळपासच असणार या भितीने नागरिकांनी तेथून पळ काढला.बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आवाहन आता वनविभागासमोर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)