भोरमळा येथे बिबट्या जेरबंद

File photo

संगमनेर – तालुक्‍यातील अकलापूर शिवारातील भोरमळा येथे वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सहा ते सात महिन्यांचा मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला. अकलापूर शिवारातील भोरमळा येथे 24 फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास प्राजक्ता तेजस मधे या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने झडप घालून ठार केले होते. या घटनेनंतर वनविभागाने त्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले होते.

एक महिन्यानंतर गुरुवारी रात्री (28 मार्च) रात्री साडेदहाच्या सुमारास सहा ते सात महिन्यांचा मादी जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रामदास थेटे, दिलीप उचाळे, बाळासाहेब वैराळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या मादीस तातडीने चंदनपुरी निसर्ग उपचार केंद्रात हलवले. तिला पुढे माणिकडोह येथील वनविभागाच्या बिबट्या निवारण केंद्रात पाठविण्यात येणार आहे. दरम्यान वनविभागाच्या पिंजऱ्यात तब्बल एक महिन्यांनी सहा ते सात महिन्यांचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असून प्राजक्ता तेजस मधे या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झडप घालून ठार करणाऱ्या बिबट्याचा अद्यापही मुक्त संचार असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)