लेहचे तापमान उणे 17.5

file photo

श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्याबरोबरच लडाखच्या परिसरात सध्या गोठवून टाकणारी थंडी पडली असून कालची लेहमधील रात्र सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करणारी ठरली. तेथे काल उणे 17.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. कालपरवा तेथील तापमान 15.5 अंश सेल्सिअस इतके होते. त्या तापमानातही काल रात्री आणखी दोन अंशांची घट झाली आहे. बर्फवृष्टी आणि कडाक्‍याच्या थंडीमुळे साऱ्या जम्मू-काश्‍मीरमधील सामान्य जनजीवन पूर्ण थंडावले आहे. श्रीनगर शहरातील तापमानही काल उणे 7.7 इतके नोंदवले गेले. गेल्या तीन दशकातील हे नीचांकी तापमान होते.

दक्षिण काश्‍मीरमधील काझीगंद येथे काल उणे 6.2 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. कुपवाडातील तापमान उणे सहा अंश सेल्सिअस इतके होते. पहलगाम या पर्यटनस्थळाचे तापमान उणे 8.3 अंशावरून घटून ते उणे 9.5 इतके झाले होते. गुलमर्गला उणे 9.3 इतके तापमान होते. जम्मू-काश्‍मिरात हा चाळीस दिवसांचा कालावधी अत्यंत गारठ्याचा असतो. त्याला तेथील स्थानिक भाषेत चिल्लाई कलान असे म्हणतात. पुढील आठवडाभर काश्‍मीर खोरे, लेह आणि लडाख परिसरात बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)