उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात आमदारांचे बंड

आरएलएसपी पक्षात उभी फूट

पाटणा: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय लोक समता पक्षात (आरएलएसपी) शनिवारी उभी फूट पडली आहे. बिहारमधील आरएलएसपीच्या दोन आमदार आणि एकमेव विधान परिषदेतील आमदार यांनी पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. आम्ही एनडीएसोबतच असल्याची घोषणा करत त्यांनी पक्षांवरही दावा सांगितला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपेंद्र कुशवाह यांनी व्यक्तीगत हितासाठी एनडीएबरोबर काडीमोड घेतल्याचा आरोप त्यांनी केला.आरएलएसपीचे विधानसभेतील आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान तसेच विधान परिषदेतील आमदार संजीव सिंह शाम यांनी आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केले. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या सुधांशू शेखर यांना मंत्रीपद देण्याचीही त्यांनी मागणी केली.

आम्ही खऱ्या आरएलएसपीचे प्रतिनिधीत्व करतो. आम्हाला पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे, असा दावा करत आपण लवकर निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. आरएलएसपीने 2014 लोकसभेची आणि त्यानंतर 2015 बिहार विधानसभेची निवडणूक एनडीएसोबत लढवली होती.

आरएलएसपीचे बिहारमध्ये कुशवाह यांच्यासह तीन खासदार आणि तीन आमदार आहेत. एनडीएचा भाग असलेले राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी सोमवारी एनडीएला सोडचिठ्ठी देताना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला. बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यापासून उपेंद्र कुशवाह नाराज होते. आपल्या पक्षाला अपेक्षित जागा मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. याच नाराजीतून त्यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. पण आता त्यांच्याच पक्षात बंडखोरी झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)