ऑग्जिल्यरी फाउंडेशनकडून रेरावर विनामूल्य मार्गदर्शन

पुणे, सदनिका, भूखंड, इमारत किंवा स्थावर संपदा प्रकल्पातील ग्राहकांना, इच्छुक नागरिकांना स्थावर संपदा (विनियमन व विकास) कायदा (रेरा) संबंधित बाबींबाबत विनामूल्य कायदेशीर सल्ला देण्यात येणार आहे.
निवृत्त जिल्हा न्यायाधूश विश्‍वास चौधरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार असून, ऍड. सुदीप केंजळकर, ऍड. नीलेश बोराटे व ऍड. मोनिका वाडकर हे कायदेशीर सल्ला देणार आहेत. कार्यक्रम रविवार दि. 1 जुलै 2018 रोजी सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत होणार आहे. हा कार्यक्रम कै. हिराबाई धनकुडे बहुद्देशीय भवन, डी- मार्टच्या जवळ, बाणेर, पुणे येथे होणार असल्याचे फाउंडेशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हा विषय घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या तसेच विकसकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)