मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत- चंद्रकात पाटील

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात वसतिगृह सुरु करण्याच्या निर्णयांची आजपासून पूर्ती होत आहे.

छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत राज्यातील पहिले सर्व सुविधांनी सुसज्ज असे वसतिगृह आज सुरु होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, या वसतिगृहात ७२ विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे. यापुढेही राज्याच्या इतरही भागात मराठा समाजातील विद्यर्थ्यांसाठी टप्प्या टप्प्याने वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी देखील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)