जाणून घ्या! सदाशिवभाऊ पेशवे यांच्याविषयी

सदाशिवभाऊ पेशवे 3 ऑगस्ट 1730 रोजी चिमाजीआप्पांच्या पोटी जन्मलेले सदाशिवरावभाऊ म्हणजे पानिपतच्या त्या लढाईतील मराठ्यांचे सेनापती. आज त्यांचा जन्मदिन. अल्पवयातच राजकारणात उतरलेल्या भाऊंनी सांगोला स्वारी, उदगीरची लढाई असे पराक्रम गाजवतच पानिपतच्या मोहिमेची सूत्रे हाती घेतली होती.
या मोहिमेत त्यांना आलेले अपयश आणि वीरमरण ही मराथ्यांच्या इतिहासातील मर्मस्थळे ठरली. भव्य कल्पना, अफाट कर्तृत्व, बुद्धिमत्तेचे तेज, तडफ, कारभारातील प्रभुत्व, दृढनिश्‍चय, असे अनेक गुण असूनही भाऊ अपयशी ठरले.
दि. 14 मार्च 1760 रोजी भाऊंनी पानिपतकडे कूच केले. दिल्ली तख्त फोडण्याचा पराक्रम केला. अब्दालीच्या तोंडचे पाणीच पळाले. पण अनपेक्षित कुमक न आल्याने भाऊ हतबल झाले.
त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. हे महाराष्ट्र शौर्याचे कुरूभूमीवरचे तेज पुन्हा दिसले नाही. सदाशिवरावभाऊंनी त्या कुरूभूमीवर प्राणांच्या समिधा अर्पण केल्या. पण पराभवाचा कलंक ते धुऊन काढू शकले नाहीत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)