नवी दिल्ली: जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा धावपट्टू गोविंदन लक्ष्मणन याला  १०,००० मीटर धावण्याची स्पर्धा तिसऱ्या क्रमांकाने पूर्ण करून देखील नाट्यमय रित्या ‘बाद’ ठरवण्यात आले होते.
धावताना दुसऱ्या स्पर्धकाच्या बुटाचा खिळा लक्ष्मणनला लागल्याने तो काही वेळासाठी धावपट्टीवरून खाली उतरल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती परंतु आता क्रीडा मंत्रालयाद्वारे क्रीडा मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी लक्ष्मणन याला १० लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
क्रीडा मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यात  “एका युवा खेळाडूचे मनोधैर्य उंचावण्यासाठी हे पारितोषिक दिले असून, लक्ष्मणन याच्याकडून भविष्यामध्ये उत्कृष्ट खेळ करत भारतासाठी सन्मान कमवण्याची अपेक्षा आहे” असे म्हणण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)