नवी दिल्ली – रॉबर्ट वढेरा यांच्यावर कारवाई करायची असेल तर करा परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले कि, कायदा सर्वांना सामन असून रॉबर्ट वढेरा चौकशी केली जात आहे. आणि ते तपासात सहकार्यही करत आहेत. परंतु, दसॉल्ट आणि राफेलच्या कागदपत्रांमध्ये मोदींचे नाव आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी झालीच पाहिजे. परंतु, मोदींनी यावर सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे. ते पुढे म्हणाले, तुम्ही किती वेळा पंतप्रधान अशा पद्धतीने ३००० महिलांसमोर बोलताना पाहिले आहेत, असा सवालही त्यांनी विचारला. ते अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे कधी दिसलेत का, असे ते म्हणाले. मोदी सध्या देशात भीतीचे वातावरण निर्माण करून आर्थिक प्रगतीविषयी चर्चा करू इच्छित नाही, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
R Gandhi: Govt has every right to investigate every person. Law should apply to everybody equally,not selectively. PM has his name in govt documents that say he is directly responsible for negotiating parallelly with Dassault on Rafale. Investigate everybody, be it Mr Vadra or PM pic.twitter.com/oa4lRWwY9V
— ANI (@ANI) March 13, 2019
https://twitter.com/ANI/status/1105722596442718208