लोक अदालत मोबाईल व्हॅनचा शुभारंभ 

कोल्हापूर – फिरती विधी सेवा तथा लोक अदालतचा (मोबाईल व्हॅन) शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने आजपासून सुरू करण्यात आलेल्या फिरती विधी सेवा तथा लोक अदालतचा मोबाईल व्हॅनचा शुभारंभ न्याय संकुल भवन येथून आज करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश महेश जाधव, सुरेंद्र वडगावकर, बी. डी. कुलकर्णी, बी. डी. शेळके, शेटे, नागलकर आणि आर. एस. निंबाळकर व आदिती कदम तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रशांत चिटणीस आदि मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने आजपासून सुरू करण्यात आलेले फिरती विधी सेवा तथा लोक अदालत मोबाईल व्हॅन संपूर्ण जिल्ह्यात प्रमुख ठिकाणी जाऊन सर्वसामान्य, गोरगरीब, वंचित, दुर्बल अशा घटकांसाठी न्यायदानाच काम करणार असल्याचे न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)