‘धुमस’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

अॅक्शन, रोमान्स, आणि रोमँटिक गाणी असलेल्या बहुचर्चित ‘धुमस’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. यावेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, माजी आमदार आनंदकुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, जीवन जानकर, संतोष पाटील यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारे लोकप्रिय नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर हे ‘धुमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयात पदार्पण करत आहेत.

रोमान्स आणि अॅक्शनचे मिश्रण असलेल्या ‘धुमस’च्या ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रिअल लाईफ मध्ये नेते असलेले उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर या चित्रपटात अभिनेत्याच्या रूपाने सुद्धा सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध संघर्ष करताना दिसणार आहेत. तसेच गोपीचंद पडळकर – साक्षी चौधरी आणि रोहन पाटील – कृतिका गायकवाड या दोन जोड्यांची रोमँटीक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडते. याशिवाय विशाल निकम, भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका ‘धुमस’ मध्ये आहेत.

-Ads-

What is your reaction?
24 :thumbsup:
45 :heart:
0 :joy:
16 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)