प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावणारा ‘आम्ही बेफिकर’चा टीजर लाँच

कॉलेजगोईंग मित्रांची धमाल कथा असलेल्या ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. उत्तम छायांकन, धमाल कथा आणि चटपटीत संवादांमुळे ८ मार्चला प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल.

हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे सहनिर्माते आहेत.चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी आम्ही बेफिकीर या चित्रपटात दिसणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, आम्ही बेफिकीर हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रणय अढांगळे यांचे संगीत असून कॅमेरामन म्हणून चित्तरंजन ढाळ यांनी काम पाहीले आहे.

खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळेच चित्रपटाचा लुकही यूथफुल असल्याचं आपल्याला टीजरमधून पहायला मिळतं. उत्तम कलाकार, धमाल कथा, चटपटीत संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला ‘आम्ही बेफिकर’ हा चित्रपट पाहून प्रेक्षकही आम्ही बेफिकर म्हणतील यात काहीच शंका नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)