लातूरच्या कचरा डेपोला भीषण आग 

लातूर – लातूरपासून काही अंतरावरच असलेल्या वरवंटी शिवारात लातूरचा कचरा डेपो आहे. या डेपोस सोमवारी पहाटे भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे होते. या आगीमुळे परिसरात धूर पसरल्याने अनेकांना त्या धुराचा त्रास होत आहे.

वरवंटी शिवारामध्ये कचरा साठवता साठवता या ठिकाणी कचऱ्याचे विशाल असा डोंगर निर्माण झाला आहे. या कचऱ्याने पहाटे अचानक पेट घेतला. कचरा पेटल्यानंतर यातून निर्माण होणारा धूरामुळे नागरिकांना त्रास होत आहे. या आगीची माहिती मिळताच लातूर महापालिकेतील उपायुक्त वसुधा फड यांनी तात्काळ अग्नीशामक दलास पाचारण करून व अनेक पाण्याचा बंबाचा वापर करून आग आटोक्‍यात आणली आहे.

लातूर महापालिकेचा रोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. तो सर्व वरवंटी शिवारात नेऊन टाकण्यात येतो. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प चालू आहे, असे सांगितले जाते. पण, वरवंटी शिवारात कचरा एवढा आहे की, तो पुन्हा पुन्हा पेटणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशात अनेकदा उष्णतेमुळे कचरा पेटू शकतो. या ठिकाणी सतत अग्निशामक दलाच्या गाड्या तैनात करणे आवश्‍यक असल्याचेही सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)