लातूर लोकसभा मतदारसंघात 60 हजारांपेक्षा अधिक बोगस मतदार 

लातूर – लातूर लोकसभा मतदार संघात 60 हजारांहून अधिक दुबार आणि बोगस मतदार असल्याचा पुरावा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. सदरील दुबार नावे कमी करावीत, या मतदारांचे एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान होऊ नये अशी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी कॉंग्रेस शिष्ठमंडळाने केली.
लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, लातूर लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक भा.ई.नागराळे व विविध सेलचे पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी जिल्हाधिकारी गव्हाणे यांची भेट घेऊन दुबार व बोगस मतदारांची यादी पेनड्राईव्हमध्ये सादर केली.

सदरील दुबार मतदार रद्‌द करुन बोगस मतदान होऊ नये यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी करणारे निवेदनही देण्यात आले. निवासी जिल्हाधिका-यांनीही कॉंग्रेस शिष्टमंडळाला सकारात्क प्रतिसाद देत बोगस मतदान रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. पुरावा म्हणुन पेनड्राईव्हमध्ये दिलेली माहिती या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)