लातूरला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा 

संग्रहित छायाचित्र
मांजरा धरणाच्या पाण्याने गाठला मृत साठा 
लातूर: मांजरा धरणाच्या पाण्याने मृत साठा गाठल्याने लातूरमध्ये आता दहा दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. लातूरच्या महापालिका आयुक्तांनी लातूर शहरात घरे, वाहने आणि परिसर साफ करण्यासाठी पाण्याच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच शहरातल्या सर्व नळांना तोट्या बसवून घेण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश न पाळल्यास महापालिका कारवाई करणार आहे. मराठवाड्याची भिस्त परतीच्या मान्सून पावसावर जास्त आवलंबून असते. त्यामुळे जर आता परतीच्या मान्सूनने दगा दिला, तर पुन्हा दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे.
2016 नंतर धनेगावच्या मांजरा धरणात चांगला पाणीसाठा होता. आता मात्र 224 द.ल.घ.मी क्षमता असलेल्या धरणात उपयुक्त साठा संपला असून, आता केवळ 45 दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे कृषी आणि उद्योगाला पुरवणाऱ्या पाण्यासंदर्भात आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. लातूर एमआयडीसीसोबतच ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा पट्ट्यातील शेतीसाठी एकमेव आधार असलेल्या या पाण्याच्या वापरावरही प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)