‘हा’ कव्हर वापरल्यास तुमचा स्मार्टफोन कधीच फुटणार नाही… 

आपल्या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेची काळजी आपल्याला नेहमीच सतावत असते, स्वतः ‘बाईकवर’ फिरताना हेल्मेट न वापराने लोक देखील स्मार्टफोनला स्क्रॅच जाऊ नये म्हणून स्क्रीनगार्ड मात्र खबरदारीने वापरताना दिसतात. अश्याच स्मार्टफोनला ‘जीवापाड’ जपणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण जर्मनी मधील एका इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याने अनोखा ‘स्मार्टफोन’ कव्हर तयार केला आहे. हा कव्हर वापरल्यास तुमचा स्मार्टफोन कितीही उंचीवरून पडला तरी त्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही.
फिलिप फ्रेंजल नाव असलेल्या हा विद्यार्थ्याने या कव्हरची डिझाईन विशिष्ट पद्धतीने तयार केली असून यामध्ये अत्याधुनिक सेंसर वापरले आहेत. कव्हर मध्ये चारही बाजूला स्प्रिंग बसविल्या असून फोन खाली पडत असल्याचे ‘सेंसर’ला जाणवताच हे स्प्रिंग्ज आपोआप उघडतात त्यामुळे फोनला कोणतीही इजा पोहचत नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)