रिटायरमेंटच्या बातमीवर लतादीदी भडकल्या

भारतरत्न आणि देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर या पार्श्‍वगायनामधून निवृत्ती स्वीकारत असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर पसरते आहे. ही बातमी जेंव्हा लतादिदींपर्यंत पोहोचली, तेंव्हा त्या चांगल्याच भडकल्या. सोशल मिडीयावर पसरलेली ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. आपण जीवनाच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत गात राहणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या आवाजातील एक गाणे व्हॉट्‌स ऍपवर व्हायरल झाले. डॉ. सलील कुलकर्णीनी संगीत दिलेले “आता विसाव्याचे क्षण’ हे गाणे लता दिदींनी गायलेले अखेरचे गाणे ठरू शकेल, असा मेसेजही या गाण्याबरोबर होता. त्यामुळे आता भविष्यात लतादिदी गाणे म्हणणार नाहीत, असे वाटल्याने त्यांचे चाहते दुःखी झाले होते.

या गाण्याचा अर्थही तसेच सांगत असल्याने श्रोत्यांची याबाबत खात्रीच पटली होती. पण ही सगळी अफवा असल्याचे लतादिदींनी स्पष्ट केले आहे. ही अफवा कशी पसरली हे आपल्याला समजत नाही. एखाद्या रिकामटेकड्याने ही अफवा पसरवली असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्‍त केला. बा.भ. बोरकर यांची कविता असल्याने गायन करायला त्या तयार झाल्या होत्या. मात्र 2013 च्या गाण्यानंतर 5 वर्षांनी त्याचा असा दुरुपयोग होईल, याचा आपल्याला अंदाज नव्हता, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)