लालकृष्ण अडवाणींनी घेतले दादा वासवानी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

पुणे: जगप्रसिध्द साधू वासवानी मिशनचे प्रमुख तथा अध्यात्मिक गुुरु दादा वासवानी यांचे गुरुवारी सकाळी 9 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. वासवानी मिशनमध्ये सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

गुरुवारी त्यांच पार्थिव अंतिम दर्शनासाठी वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

आज दुपारी दोन वाजता साधू वासवानी मिशन येथून रथयात्रा काढून सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दादा वासवानी यांचे पुर्ण नाव जशन पहलराज वासवानी असे होते. सिंधी समाजाचे धार्मिक गुरु अशी त्यांची ओळख होती. त्यांनी त्यांच्या आयुष्यात शाकाहाराचा प्रचार केला. दादा वासवानी यांच्यावर गेल्या काही दिवासांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्यांना घरी आणले होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)